द्रुतगती मार्गावर बस उलटली, चिमुरडी ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळील वळवण पुलावरील वळणावर बस उलटल्याने झालेल्या अपघातात चारवर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला, तर पंचवीस प्रवासी जखमी झाले. 

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळील वळवण पुलावरील वळणावर बस उलटल्याने झालेल्या अपघातात चारवर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला, तर पंचवीस प्रवासी जखमी झाले. 

मंगळवारी (ता. १६) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. सिद्धेश्‍वर ट्रॅव्हल्सची बस (एमएच ०४ जीपी ४७४७) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना लोणावळ्याजवळील वळवण पुलावरील वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. बस द्रुतगती मार्गावर फरफटत गेल्याने बसमधील पंचवीस प्रवासी जखमी झाले असून एका चारवर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिक, पोलिस कर्मचारी, आयआरबी कंपनीचे कर्मचारी, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. गाडीच्या काचा फोडत जखमींना बसच्या बाहेर काढत उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, जखमींमध्ये सहा बालकांचा समावेश असून त्यातील चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बसमध्ये एकूण ५५ प्रवासी होते. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017