पिंपरीतील व्यापाऱ्याची एक कोटींची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पिंपरी - एका व्यापाऱ्याकडून एक कोटीचा माल घेऊन पैसे न देता चौघांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सप्टेंबर 2016 ते मार्च 2017 या काळात फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याच्या वेगवेगळ्या दुकानांत घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

रितेश ऊर्फ चुवडमल जेसवानी (वय 27), चुवडमल देवनदास जेसवानी (वय 57), विशाल चुवडमल जेसवानी (वय 25, तिघेही रा. पिंपरी कॅम्प) व काळेवाडी-विजयनगर, वर्धमान सोसायटीतील राहणारा एक 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सचिन सुरेंद्र मागू (वय 32, रा. रो-हाऊस नं. 8, सिंधू पार्क सोसायटी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मागू यांचा वेगवेगळ्या कंपन्यांच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय असून साई चौक, शगून चौक, पिंपरी आणि चिंचवड लिंक रोड या दुकानातून वेळोवेळी उधारीवर मालाची खरेदी केली. मात्र नंतर पैसे देण्याबाबत सतत टाळाटाळ केली. तसेच पुन्हा पैसे मागितले तर तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करू व तुम्हाला अडकवू, अशी धमकी देऊन सचिन यांची आर्थिक फसवणूक केली. 

Web Title: businessman crore fraud in Pimpri