उमेदवारी याद्यांना ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

युती, आघाडीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू; इच्छुकांमध्ये धाकधूक

पुणे - ‘आचारसंहितेनंतर लगेचच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू, प्रचारात आघाडी घेऊ...’, अशा घोषणा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी
केल्या खऱ्या; पण ‘आघाडी’ आणि ‘युती’च्या चर्चेच्या फेऱ्यांमुळे त्या फोल ठरल्या आहेत. या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीला ‘ब्रेक’ लागला आहे.

आणखी चार ते पाच दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आठवडाभरानेच यादीला मुहूर्त लागण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची आघाडी; तर भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आठवडाभरात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न होता.

राष्ट्रवादी काँग्रेसने तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच उमेदवारांची नावे जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यावर दोन दिवसांत यादी जाहीर करण्यात येईल, असे पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले होते, तर २० किंवा २१ जानेवारीला काही प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर करू, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. त्या पाठोपाठ २४ जानेवारीपर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे भाजप आणि शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. 

मात्र, दोन्ही काँग्रेसची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांच्यात युतीच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी बैठकाही होत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे, तर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दोन बैठका झाल्या असून, त्यामुळे आघाडी आणि युतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, चर्चेच्या फेऱ्या वाढत असल्याने जाहीर केल्याप्रमाणे एकाही राजकीय पक्षाची यादी त्या - त्या वेळेत जाहीर होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट 
झाले आहे. 

जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. आमच्या मागण्या राष्ट्रवादीकडे मांडल्या आहेत, तर त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात येत आहेत. पुढील काही दिवसांत यादी जाहीर होईल.
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस 

शिवसेनेबरोबर युती करण्याच्या दृष्टीने जागावाटप आणि अन्य बाबींवर चर्चा होत आहे. या संदर्भातील निर्णय झाल्यानंतर यादी जाहीर केली जाईल.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार भाजपच्या नेत्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्यात येत आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. चर्चा संपल्यावर उमेदवारांची नावे जाहीर करू.
- विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: candidate list stop