आता घरबसल्या भरा उमेदवारी अर्ज

Online
Online

यावर्षापासून प्रथमच ऑनलाइन पद्धत

पिंपरी : ऑनलाईनच्या जमान्यात सरकारी यंत्रणेनेही कात टाकली असून यावेळी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याची सोय प्रथमच करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कार्यालयात जाण्याऐवजी घरबसल्या,कार्यालयात वा अगदी नेटकॅफेतूनही किंवा नागरी सुविधा केंद्रातूनही (सीएफसी) हा अर्ज उमेदवारांना आता भरता येणार आहे. त्यासोबतची शपथपत्रेही तशी सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे.

उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण करण्यासाठी प्रथमच एकॅऍपही विकसित करण्यात आले आहे. मात्र, सोशल मिडीयावरील प्रचाराचे नियंत्रण करणे तांत्रिकदृष्ट्या अवघड जाणार असल्याची कबुली खुद्द पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी (ता. 12) दिली.

यावेळच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नव्याने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार उमेदवाराचे संपत्ती व गुन्हेगारीविषयक शपथपत्राच्या अनालिसीसचे काम केडीआर या 'एनजीओ ला देण्यात आले आहे.तसेच ही माहिती प्रत्येक मतदानकेंद्राबाहेरही लावली जाणार आहे.त्यानुसार मतदानाचा निर्णय मतदाराला यावेळी घेता येणार आहे. उमेदवाराला राष्ट्रीयकृत बॅंकेत निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडावे लागणार असून खर्चाचा स्त्रोतही नमूद करावा लागणार आहे.

दरम्यान, मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या (ता.12) पालिका आयुक्तांनी बोलावलेल्या समन्वय बैठकीत केल्या.त्यामुळे या प्रारूप यादीवर मोठ्या प्रमाणावर येत्या पाच दिवसांच्या मुदतीत हरकती व आक्षेप येण्याची शक्‍यता आहे.

आकडे बोलतात

  • पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या (2011 च्या जनगणेनुसार) : 17,27,696
  • मतदार : 12,03,452
  • प्रभाग : 32
  • नगरसेवक :128
  • गत निवडणुकीतील मतदानाचा टक्का : 52
  • यावेळचे मतदान टक्केवारीचे उद्दिष्ट : 70
  1. मतदार जागृती व मतदान टक्का वाढीसाठी सोशल मिडियाचा वापर आणि भर,
  2. कॉलेजचे तरुण ऍम्बसॅडर
  3. उमेदवारांना विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजना
  4. चारपैकी एक मत दिले तरी ग्राह्य, शिवाय 'नोटा'चाही पर्याय
  5. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी उमेदवारांना सहा महिन्याची मुदत
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com