'कॅशलेस'मधून रेल्वेला तीन दिवसांत 15 लाख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पुणे - रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या कॅशलेस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत या माध्यमातून 2 हजार 729 तिकिटे काढली आहेत. याद्वारे रेल्वेला तब्बल 15 लाख सत्तर हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पुणे - रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या कॅशलेस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत या माध्यमातून 2 हजार 729 तिकिटे काढली आहेत. याद्वारे रेल्वेला तब्बल 15 लाख सत्तर हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे रेल्वे आणि प्रवाशांना रोख रकमेची अडचण जाणवू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रामध्ये ही सेवा सुरू केली. डेक्कन, रविवार पेठ, पुणे लष्कर, शंकरशेठ मार्ग, खडकी, चिंचवड आणि बारामती अशा सात ठिकाणच्या आरक्षण केंद्रांमध्ये "पीओएस' मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे स्थानकावर सुरू केलेल्या या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आज (शुक्रवारी) मंडल रेल प्रबंधक बी. के. दादाभॉय यांनी पाहणी केली. तसेच "पीओएस' मशिनवर काम करणारे कर्मचारी आणि प्रवाशांशी संवाद साधला. पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे विभाग संपूर्ण कॅशलेसचे काम चार टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीमचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी "पीओएस' मशिन बसविण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात उपनगरीय, तिसऱ्या टप्प्यात पार्सल, लोकल कॅशलेस करण्यात येणार आहेत. चौथ्या टप्प्यात उर्वरित सर्व व्यवहार कॅशलेस केले जातील, असे बी. के. दादाभॉय यांनी सांगितले.

पुणे

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी...

09.06 AM

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली...

08.48 AM

पुणे - जमीन, घर खरेदी विक्रीसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने मुद्रांकशुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यावर उपाय...

05.33 AM