सावधान...इथं धोका आहे

42_58_1904_1678.jpg
42_58_1904_1678.jpg

पुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा जास्त होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या पाहणीतील काही ठळक मुद्दे...  

वाघोली
 - वाघोलीत २०० पेक्षा अधिक होर्डिंग अनधिकृत
 - कारवाईसाठी तहसील कार्यालय पातळीवर समिती स्थापन 
-  कारवाईबाबत प्रशासनाचे एकमेकांकडे बोट चालढकल सुरू आहे.

वडगाव शेरी 
- खराडी, कल्याणीनगर परिसरात अनधिकृत होर्डिंगचे प्रमाण जास्त
   कारवाईसाठी मनुष्यबळ आणि यंत्रणा अपुरी
 - विद्युत खांबावर दर आठवड्याला अनधिकृत जाहिराती लटकवल्या जात असल्याने 
    लोखंडी कडा कधी कधी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरतात 
 - वडगाव शेरीत २१४ अधिकृत, तर अठरा होर्डिंग अनधिकृत
-  अनधिकृत होर्डिंग तातडीने हटविण्याचा प्रभाग समितीमध्ये निर्णय.

हडपसर 
- वानवडी- फातमीनगर, जांभूळकर चौक, सोलापूर रस्त्यावर धोकादायक होर्डिंग
 -  नागरिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाची कारवाई नाही
-  कारवाईकडे आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष
 - न्यायालयाच्या आदेशानंतरही संख्या वाढली

कोंढवा
- खडीमशिन चौक, कात्रज रस्ता, गोकुळनगर, हांडेवाडी चौक, मंतरवाडी बाह्यवळण मार्ग, टिळेकरनगर, पिसोळी रस्ता, ज्योती चौक, कोंढवा खुर्द गावठाण येथे अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट.
- राजकीय होर्डिंगना पालिकेकडून राजाश्रय.

बावधन
- बावधन, भूगाव, भुकूमला अनधिकृत होर्डिंगना पेव 
- मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुटाच्या अंतरावर होर्डिंग 
- नोटीस देऊनही कारवाईकडे दुर्लक्ष

मुंढवा
- कोरेगाव पार्क येथील भैरोबा नाल्यात, रेणुका माता वस्तीजवळ होर्डिंगना पेव
-  वादळी पावसात दोन होर्डिंग भैरोबा नाल्यात कोसळले.

विश्रांतवाडी
- विश्रांतवाडी-धानोरी, लोहगाव परिसरात होर्डिंग्जना पेव
 - गृहप्रकल्पांमुळे धानोरी रस्ता, विमानतळ रस्ता, आळंदी रस्ता येथे प्रमाण जास्त 
 - अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कारवाईकडे आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष

खडकी
- खडकी कॅंटोन्मेंट हद्दीत १४, तर वाकडेवाडी ६ अधिकृत होर्डिंग 
-  बिझनेस सेंटर-२, राजीव गांधी चौपाटी, त्रिकोणी उद्यान, होळकर पूल, साप्रस,            पाचवड चौक, अंडी उबवणी केंद्र, बस स्थानक, राणी लक्ष्मीबाई उद्यान, रेंजहिल्स, खडकी बाजारामध्ये फ्लेक्‍सना पेव

पौड रस्ता
- कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ११८ अधिकृत, तर नऊ अनधिकृत होर्डिंग 
 कारवाईसाठी पालिकेचे पोलिसांना असहकार्य
 - जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत फक्त एकच अनधिकृत होर्डिंग पाडल्याची माहीती
 - अनेक ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त लांबी, रुंदीचे होर्डिंग

कोथरूड
- कर्वेनगरमध्ये राजाराम पुलाशेजारी नदीपात्रात धोकादायक पद्धतीने होर्डिंगची उभारणी
 - कर्वे रस्त्यावरील अभिनव चौक, करिश्‍मा चौक आणि कर्वे स्मारक चौकात उंचच उंच होर्डिंग्ज 
-  कर्वे रस्त्यावरील खंडोजीबाबा चौकात होर्डिंगचा सुळसुळाट  

एरंडवणे 
- नळस्टॉप चौकात होर्डिंगना पेव
-  होर्डिंगच्या खांबांची वेळच्या वेळी डागडुजी नाही 
-  अनेक ठिकाणी होर्डिंगविना खांब
 - कर्वे रस्त्यावर गरवारे महाविद्यालयासमोर पदपथावरच थाट

सिंहगड रस्ता 
- सिंहगड रस्त्यावर पोवलोपावली बेकायदा होर्डिंग 
-  पु. ल. देशपांडे उद्यान, आनंदनगर चौक, हिंगणे चौक, विठ्ठलवाडी, टीजेएसबी बॅंकेजवळील, गणेशपार्क, भंडारी हॉस्पिटल येथे प्रमाण अधिक

धायरी 
- धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द रस्त्यावर ३ अनधिकृत होर्डिंग
-  अनेक घरे तसेच इमारतींवर होर्डिंगचा सुळसुळाट
-  राजकीय पदाधिकाऱ्यांची आघाडी

बिबवेवाडी 
- बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ७३ होर्डिंग
 - ३ धोकादायक होर्डिंगला नोटीस 
-  गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर होर्डिंगचे जाळे

घोरपडी
- घोरपडी गाव आणि कॅंटोन्मेंट परिसर, बी. टी. कवडे रस्त्यावर अनधिकृत होर्डिंगचे जाळे
- अनेक घरांवर, तसेच दोन मजली इमारतींवर अनधिकृत होर्डिंग
-  ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सर्वेक्षण सुरू
-  राजकीय नेते, कोचिंग क्‍लासेस, ट्रेनिंग सेंटरच्या जाहिरातींचे प्रमाण अधिक

कात्रज
- महापालिका हद्दीतील कात्रज ते स्वारगेट या सात किलोमीटर परिसरात अधिकृत फलकांपेक्षा अनधिकृत फलकांची संख्या जास्त.
-  महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेला आंबेगाव बाह्यवळण मार्ग, जांभूळवाडी रस्ता परिसरात होर्डिंग्जवर नियंत्रण नाही.
- धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आकाशचिन्ह कारवाईसाठी अपुरे मनुष्यबळ.
 - अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांसमवेत संयुक्त कारवाई करण्यात उदासीनता.

उंड्री
- नियंत्रण व्यवस्था, कररचना नसल्याने ग्रामपंचायत काळात भरमसाट होर्डिंग्ज.
 जाहिरातीद्वारे उत्पन्न मिळत असल्याने घर, इमारतींवर  सांगाडे उभारण्याची स्पर्धा.
 होर्डिंग्ज १०० च्या आसपास.
-  वादळामुळे तीन वर्षांपूर्वी उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर होर्डिंग्ज पडल्याने आठवडाभर विद्युत पुरवठा खंडित. 
- बांधकाम व्यावसायिकांचे विनापरवाना होर्डिंग्जचे प्रमाण लक्षणीय.

खडकवासला 
- शहरालगत गाव असल्याने होर्डिंगची संख्या जास्त.
-  ग्रामपंचायत हद्दीत होर्डिंग उभारणीसाठी नियमावली नाही.
- ग्रामपंचायत हद्दीत होर्डिंग उभारण्यासाठी संमतिपत्र व अर्जावर मिळते परवानगी. 
 - होर्डिंगच्या उंची, लांबी, रुंदीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
-  रस्त्यालगत, रस्त्यालगतच्या भिंतीवर धोकादायक पद्धतीने उभारणी.
-  उभारलेले होर्डिंग सुरक्षित आहे का, पाहणारी यंत्रणा नाही.

येरवडा 
- येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अधिकृत ५९, तर अनधिकृत ५ होर्डिंग
 - विमानतळ रस्ता, नगर, औरंगाबाद महामार्ग, आयटी कंपन्यांमुळे होर्डिंगची स्पर्धा
-  अनेक होर्डिंगची प्रशासन दफ्तरी नोंदच नाही
 - काही होर्डिंगवर बेकायदा वीजजोड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com