कृतीयुक्त कार्यक्रमांनी महापुरुषांची जयंती साजरी करा - बापु बांगर

प्रशांत चवरे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

भिगवण - भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त विविध संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक येथील बौध्द विहारामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापु बांगर बोलत होते.

भिगवण - भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त विविध संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक येथील बौध्द विहारामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापु बांगर बोलत होते.

महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणाचा व विकासाचाच विचार केला. त्यांचे महान कार्य हे पुढील पिढीपर्यत पोचविण्याचे काम अनुयायांनी केले पाहिजे. पोवाडा, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा अशा कृतीयुक्त कार्यक्रमांच्या माध्यमातून महापुरुषांची जयंती साजरी केली पाहिजे. जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्रावर व विविध सामाजिक पैलुवर प्रकाश टाकण्याची आवश्यकता असल्याचे असे मत बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापु बांगर यांनी व्यक्त केले  

बैठकीस भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, पंचायत समितीचे सदस्य संजय देहाडे, माजी सरपंच प्रशांत शेलार, डिकसळचे सरपंच सुर्यकांत सवाणे, अजिंक्य माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, माजी सरपंच पराग जाधव, पोंधवडीचे पोलिस पाटील सोमनाथ सोनवणे, सचिन बोगावत, डॉ. एल.जी. शहा व पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. बांगर पुढे म्हणाले, गौतम बुध्दांनी सांगितलेल्या पंचशील तत्वाचा अवलंब केल्यास समाजामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. पोलिसांच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, पोलिसांची भूमिका ही जयंती उत्सवाच्या आनंदाला बाधा आणण्याची नाही तर सर्व समाजाला एकत्र घेऊन हा उत्सव अधिक विधायक पध्दतीने साजरा करण्यासाठी मार्गदर्शक अशी आहे.  

भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना तरुण मंडळानी नियमांचे पालन करावे. मिरवणुकी दरम्यान डी.जे. सारख्या वाद्याचा वापर टाळावा. जयंतीच्या निमित्ताने सामाजिक सलोखा राखण्यासाठी तरुण मंडळानी सहकार्य करावे. यावेळी तनुजा कुताळ, अशोक शिंदे, संजय रायसोनी, विक्रम शेलार, महेश शेंडगे, अॅड. पाडुरंग जगताप, रोहित शेलार, शरद चितारे आदींनी मनोगत व्यक्त केले. 

गावातील पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आयोजनाबाबत प्रशासनास सुचना केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवानंद शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन भिगवण पोलिस ठाणे व अमर बौध्द युवक संघटनेचे अमोल कांबळे, लालासाहेब वाघमारे, अजय शेलार, संघर्ष धेंडे, गणेश शेलार यांनी केले.

Web Title: Celebrate any Jayanti with action programs - bapu bangar