153 कोटींच्या दंडाची मध्य रेल्वेकडून वसुली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

पुणे : विनातिकीट प्रवास, तिकीट मर्यादेपेक्षा जास्त प्रवास करणे आदी प्रकरणांतून मध्य रेल्वेने सरत्या आर्थिक वर्षात 153 कोटी 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

सरत्या आर्थिक वर्षात 31 लाख 45 हजार प्रकरणांतून रेल्वेने 153 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात या प्रकरणांची संख्या 26 लाख 88 हजार होती.

दंडवसुलीच्या प्रकरणांत सुमारे 17 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून दंडाच्या रकमेतही सुमारे 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 128 कोटी 63 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

आरक्षित प्रवासी तिकीट हस्तांतराच्या 199 प्रकरणांची सरत्या आर्थिक वर्षांत नोंद झाली असून, त्यातून 1 लाख 81 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

Web Title: Central Railway recovers 153 Cr from unruly passengers