सोनसाखळी चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे - सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.

त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे 22 आणि वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून 28 लाख 56 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुक्तार सय्यद नूर इराणी (वय 19), वसीम शमीम पटेल (वय 19), अलिरजा हुसेन इराणी (वय 19) आणि इम्रान फिरोज इराणी (वय 24, सर्व रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. शहरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी टोळीतील चोरट्यांबाबत गुन्हे शाखेतील युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांना माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्‍त आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त भोसले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, उपनिरीक्षक प्रकाश अवघडे, कर्मचारी अशोक भोसले, स्टीव्हन सुंदरम, गुणशिलम रंगम, राजू रासगे, अनिल घाडगे, अनिल भोसले, शिवानंद स्वामी यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सराईत गुन्हेगारांना अटक केली. तपासादरम्यान त्यांनी समर्थ, हडपसर, वानवडी, मार्केट यार्ड, स्वारगेट, बिबवेवाडी, सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे माळवाडी, खडकी, वाकड, सांगवी, भोसरी आणि कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी आणि वाहने चोरल्याची कबुली दिली.

हा चोरीचा ऐवज कालिदास सुदाम काळभोर (वय 38, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) आणि बिश्‍वजीत गणपती माल (वय 47, रा. गणेश पेठ) यांनी आरोपींकडून विकत घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

पन्नास गुन्हे दाखल
इम्रान इराणी याच्याविरुद्ध पुण्यात सोनसाखळी चोरीचे 50 गुन्हे दाखल आहेत. तो पुणे, ठाणे आणि कर्नाटकातील बेळगाव येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत फरारी होता. त्यापैकी चार गुन्ह्यांत त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे; तर मुक्‍तार इराणी हा सराईत गुन्हेगार 24 गुन्ह्यांत वॉंटेड होता.

Web Title: chain snacher interstate gang arrested