गुंतवणुकीसाठी चाकण नंबर १

सुधीर साबळे
गुरुवार, 20 एप्रिल 2017

४०७ कोटींची जिल्ह्यात गुंतवणूक
२२६ उद्योजकांकडून सामंजस्य करार  

पिंपरी - पुणे जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील उद्योजकांनी ४०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सुमारे सहा हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

उद्योजकांनी चाकण औद्योगिक क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे उद्योग विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले.
पुणे जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील २२६ उद्योजकांनी उद्योग विभागाशी सामंजस्य करार केलेले आहेत.

त्यातील ४० उद्योग सुरू झाले असून, उर्वरित लवकरच सुरू होणार आहेत. यात इंजिनिअरिंग, ॲल्युमिनिअम कास्टिंग, फॅब्रिकेशन, मल्टिकास्टिंग, प्लॅस्टिक उत्पादने आदी उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तसेच, शहर परिसरातही अनेक मोठ्या कंपन्या येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पारगावमध्ये गारमेंट क्‍लस्टर
गारमेंट क्षेत्रातील कंपन्यांच्या सोयीसाठी उद्योग विभागाने आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथे गारमेंट क्‍लस्टर उभारण्याचे निश्‍चित केलेले आहे. या क्‍लस्टरमध्ये कपड्यांवर एम्ब्रॉयडरी आणि रबर प्रिंटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या क्‍लस्टरसंदर्भात गारमेंट उद्योगातील कंपन्यांशी चर्चा करण्याचे काम सुरू आहे. 

जुन्नरमध्ये राइस मिल क्‍लस्टर 
जुन्नरमध्ये राइस मिल क्‍लस्टर उभारण्याचे नियोजनही उद्योग विभागाने केले आहे, असे उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.