स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बीआरटी मार्गात बदल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पुणे : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विद्यापीठ (आचार्य आनंदऋषीजी) चौक ते बालेवाडी फाटा या मार्गाऐवजी आता विद्यापीठ चौक ते औंध येथील राजीव गांधी पूल या मार्गावर बीआरटी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा मार्ग सुमारे साडेतीन किलोमीटरचा असेल. 

हा बीआरटी प्रकल्प पालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 78 कोटींच्या खर्चापैकी 43 कोटी रुपयांचा निधी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (पीएसडीसीएल) कंपनीकडून पालिकेला देण्यात येणार आहे.

पीएसडीसीएलच्या संचालक मंडळाच्या उद्या (ता. 29) होणाऱ्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विद्यापीठ चौक ते बालेवाडी फाटा या आठ किलोमीटरच्या मार्गावर बीआरटी मार्ग सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग याच रस्त्यावरून जात आहे.

बीआरटी आणि मेट्रो असा सुमारे साडेपाच किलोमीटरचा मार्ग एकाच रस्त्यावरून जात असल्यामुळे बीआरटीचा खर्च वाया जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील बीआरटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Changes in BRT route in Pune under Smart City scheme