चपातीच्या जोडीला मक्याची रोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बारामती - बारामती व इंदापूर तालुक्‍यात स्वस्त धान्य दुकानांत रेशनवर गेल्या चार दिवसांपासून गव्हाच्या जोडीने मका दिला जात आहे. तीन किलो गव्हाऐवजी आता दोन किलो गहू आणि एक किलो मका मिळत असल्याने शिधापत्रिकाधारक चक्रावले आहेत.  

संपूर्ण राज्यातच राज्य सरकारने सरकारी खरेदी केंद्रांवर घेतलेला मका आता रेशनवर १ रुपया किलो दराने देण्यास सुरवात केली आहे. सध्या बारामती व इंदापूर तालुक्‍यातही या मक्‍याचे वितरण सुरू असून मोठ्या गावांऐवजी सध्या त्याचे कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये वितरण सुरू आहे. हा मका अंत्योदय कार्डधारकांना दिला जाणार आहे. 

भरड धान्य हे स्वस्त धान्य दुकानांतून देण्याची दोन वर्षांपूर्वी केलेली घोषणा प्रत्यक्षात आणताना सरकारने हा वेगळाच मार्ग स्वीकारला आहे. त्यावर विरोधी पक्षांनीही टीका केली आहे. मात्र सध्या आलेला मका स्वस्त धान्य दुकानदार सक्तीने लाभार्थ्यांच्या पिशव्यांमध्ये भरू लागले आहेत. या मक्‍याचे काय करायचे, या चिंतेत सध्या लाभार्थी आहेत. काही वर्षांपूर्वी मिलो रेशनवर वितरित केला जात होता, त्या वेळी भारतात अन्नधान्याची टंचाई होती. आता तशी काहीच स्थिती नसताना भरड धान्यात इतरही धान्यांचा समावेश असताना केवळ मकाच वितरित होत असल्याबद्दल लाभार्थीही नाराजी व्यक्त करीत आहेत.

सर्वच ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांत मका वितरित केला जाणार आहे. सध्या काही स्वस्त धान्य दुकानांत याचे वितरण केले जात आहे. 
- हनुमंत पाटील,  तहसीलदार, बारामती

Web Title: chapati wheat Maize ration shop