बाल स्नेही पोलीस कक्ष, तक्रारदार महिला व बालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना - डॉ.देशमुख

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला.
Child Friendly Police Room Complainant Women and Children Feel Safe  Dr Deshmukh police department important role in society
Child Friendly Police Room Complainant Women and Children Feel Safe Dr Deshmukh police department important role in societysakal

नारायणगाव : बालकांच्या न्याय हक्कासाठी व सुरक्षितेसाठी समाजात निकोप वातावरण निर्माण करण्यासाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर व कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नवी दिल्ली या सेवाभावी संस्थेने सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे .या संस्थेच्या माध्यमातून नारायणगाव पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू केलेल्या बाल स्नेही पोलीस कक्षा मुळे तक्रारदार महिला व बालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. असा विश्वास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला.

राज्य पुरस्कार प्राप्त संस्था ज्ञानशक्ती विकास वाहिनी मंचर व नोबल प्राइस विनर कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नवी दिल्ली या समाजसेवी संस्थेच्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील पाहिल्या बाल स्नेही पोलीस कक्षाची उभारणी केली आहे. बाल स्नेही पोलीस कक्षाचे उदघाटन आज सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका गार्गी काळे- वळसे पाटील, पोलीस निरीक्षक विकास जाधव , प्रमोद क्षिरसागर, परशुराम कांबळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, युवा नेते अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, गुलाबराव नेहरकर , सरपंच योगेश पाटे, राजेंद्र मेहेर,महेश शेळके, विकास दरेकर, गणेश वाजगे,ज्ञानशक्ती संस्थेच्या उपाध्यक्षा रंजना शेटे , सचिव उत्तम भेकेआदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले बालकांच्या सुरक्षितेसाठी जागृत असणे आवश्यक आहे.बालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना बालके गुन्हेगारी प्रवृत्तीकडे का वळतात ? परिस्थितीमुळे त्यांनी गुन्हा केला आहे का? की स्वतःहून त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडला या बाबीचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यायग्रस्त मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनने देशात बचपन बचाओ आंदोलन केले. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेऊन बालकांसाठी नवीन कायदे केले. बारा वर्षा खालील व बारा ते अठरा या दोन वयोगटातील मुले पोलीस स्टेशन मध्ये येतात. यापैकी बारा वर्षाखालील आरोपी मुलांना कायद्यात शिक्षेची तरतूद नाही.मात्र बारा ते अठरा या वयोगटातील मुलांना कायद्याच्या तरतुदी लागू पडतात. ज्ञानशक्ती सामाजिक संस्था व कैलास सप्तर्षी फाउंडेशन देशासाठी काम करत आहेत.पुणे जिल्ह्यात अन्य पोलीस ठाण्यातही बाल स्नेही पोलीस कक्ष उभारणीसाठी ज्ञानशक्ती व कैलाश सत्यार्थी ने पुढाकार घ्यावा असे आवाहन या वेळी डॉ. देशमुख यांनी केले. या वेळी बुचके व बेनके यांनी मनोगत व्यक्त केले.बाल स्नेही कक्षाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन या वेळी बेनके यांनी दिले. आभार सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली सुपेकर यांनी केले . नियोजन ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या उपाध्यक्षा रंजना शेटे, सचिव उत्तम भेके, कार्यकारी संचालिका गार्गी काळे वळसे-पाटील यांनी केले.

गार्गी काळे- वळसे पाटील(कार्यकारी संचालिका: ज्ञानशक्ती विकास वाहिनी ) : पोलीस आणि लहान बालक यांच्यात समन्वय निर्माण व्हावा,बालकांचे हक्क सुरक्षित रहावेत. यासाठी बाल स्नेही पोलीस कक्ष नक्कीच आदर्शवत ठरणार आहे. लहान मुलांसह तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेली महिला व मुलांना घरगुती वातावरण वाटावे यासाठी या कक्षात स्वतंत्र स्तनपान कक्ष,स्वच्छता गृह, स्वच्छ पिण्याचे पाणी, खुर्च्या,खेळणी, फॅन, विविध शालेय वस्तू आदी सुविधा निर्माण केल्या आहेत. यामुळे तक्रारदार महिला व बालके यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल.संस्थेची वतीने यवत पोलिस ठाण्यात जिल्ह्यातील दुसरे बाल स्नेही पोलीस कक्ष उभारण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com