चॉकलेट, मिठाई, चिप्स शाळांमधून हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पुणे - राज्यातील शाळांमधून आता चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, शर्करायुक्त शितपेये यांसह सर्व प्रकारचे जंकफूडची विक्री आणि वितरण हद्दपार करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. शाळांमधे केवळ सकस अशा गव्हाची चपाती, भात, भाजी, इडली, वडा, सांबर, नारळाचे पाणी, जलजिरा असे पदार्थांची विक्री वा वितरण करावे लागणार आहे. 

विद्यार्थ्यांमधे वाढत चाललेला लठ्‌टपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय काढण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना जादा साखर, मीठ आणि मेदयुक्त प्रदार्थ वर्जित करून आरोग्यास लाभदायक पदार्थ वापरण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृतीगट करण्यात आला होता. 

कृतीगटाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ द्यावेत आणि देऊ नयेत यासंबंधी शिफारशी केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने शाळांमध्ये काही पदार्थांवर बंदी घातली आहे. शाळेच्या उपहारगृहातून या पदार्थ्यांची विक्री वा वितरण बंद करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे. या शिवाय मुलांनी जंकफूड खाऊ नये यासाठी शाळांनी जागृती देखील करायची आहे. 

या पदार्थांवर बंदी 
तळलेले पदार्थ, बटाट्याचे चिप्स, शर्करायुक्त शीतपेये, सरबत, बर्फाचा गोळा, गोड रसगुल्ले, गुलाबजामुन, पेढा, कलाकंद, नूडल्स, पिझ्झा-बर्गर, टिक्का, पाणीपुरी, सर्व प्रकाराच्या चघळण्याच्या गोळ्या, कॅंडी, जिलेबी, बुंदी, सगळ्या प्रकारची मिठाई, केक, बिस्किट, बन्स-पेस्ट्री, जाम-जेली 

हे पदार्थ मिळणार 
गव्हाची रोटी, पराठा, भात, भाजी-पुलाव, डाळ, काळा चना, गव्हाचा हलवा, राजमा, कढीभात, खिचडी, पपई, टोमॅटो, अंडी, उपमा, इडली, वडा सांबर, दही, ताक, लस्सी, भाज्यांचे सॅंडविच, भाज्यांची खिचड, नारळाचे पाणी, जलजिरा.

Web Title: Chocolate, dessert, chips Exile from schools