चॉइस नंबरमधून पुण्याला 15 कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पिंपरी चिंचवड आरटीओला 10 कोटींचे उत्पन्न
पुणे - वाहनासाठी चॉइस नंबर (पसंती क्रमांक) घेणाऱ्यांच्या यादीत पुणे शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. गेल्या दहा महिन्यांत पुणे विभागात 35 हजारांहून अधिक वाहनचालकांनी चॉइस नंबर घेतला असून, त्यातून

पिंपरी चिंचवड आरटीओला 10 कोटींचे उत्पन्न
पुणे - वाहनासाठी चॉइस नंबर (पसंती क्रमांक) घेणाऱ्यांच्या यादीत पुणे शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. गेल्या दहा महिन्यांत पुणे विभागात 35 हजारांहून अधिक वाहनचालकांनी चॉइस नंबर घेतला असून, त्यातून

आरटीओला 30 कोटी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये पुणे आरटीओला 15 कोटी 90 लाख, तर पिंपरी चिंचवड आरटीओला 10 कोटी 11 रुपयांचा महसूल मिळाला आहे.

दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी आवडीचा आणि आकर्षक क्रमांक असावा, अशी प्रत्येक वाहनचालकाची इच्छा असते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चॉइस नंबर घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच आरटीओला दर दोन ते तीन महिन्यांनी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करावी लागत आहे. चॉइस नंबर मिळविण्यासाठी वाहनचालक खर्चाची तयारी दर्शवीत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत आहे. पुणे विभागातील पुणे, पिंपरी, सोलापूर, बारामती, अकलूज या कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल पुणे कार्यालयात जमा झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पिंपरी कार्यालय आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर कार्यालय आहे. विभागात सर्वांत कमी अकलूज कार्यालयाला 81 लाख 48 हजारांचा महसूल मिळाला आहे. बहुतांश आरटीओ कार्यालयाने ठरविलेले लक्ष्य पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाल्याचे आरटीओ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
दर वर्षीच महसुलाच्या बाबतीत पुणे विभाग अग्रेसर असतो. यंदाही ही परंपरा पुणे विभागाने राखली आहे. पुढच्या वर्षी चॉइस नंबरचा महसूल वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न केले जाणार आहेत. या वेळी वर्षभरासाठीचे लक्ष्य दहा महिन्यांतच पूर्ण झाले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आरटीओ प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आरटीओ वाटलेले क्रमांक मिळालेला महसूल
पुणे 17 हजार 558 15 कोटी 90 लाख
पिंपरी 11हजार 585 10 कोटी 11 लाख
सोलापूर 2 हजार 982 2 कोटी 14 लाख
बारामती 2 हजार 369 1 कोटी 97 लाख
अकलूज 1हजार 136 81 लाख 48 हजार