ख्रिसमस मॅचिंग

ख्रिसमस मॅचिंग

पुणे - ‘ख्रिसमस’साठी खास लाल रंगातील ‘आउटफिट्‌स’, आकर्षक पद्धतीच्या ‘ॲक्‍सेसरीज’... नेल आर्ट, डेकोरेटिव्ह हेअर स्टाइल... या आणि अशा असंख्य गोष्टी खरेदी करण्यासाठी तरुणींची लष्कर परिसरात गर्दी होऊ लागली आहे. नाताळ स्पेशल सेलिब्रेशन खरेदीसाठी महिला आणि तरुणींनी ही खरेदी सुरू केली आहे. यंदा मॅचिंगसाठी खास ॲक्‍सेसरीज उपलब्ध झाल्या आहेत. 
 

सध्या नाताळच्या पार्टीला जाताना एक हटके लुक आणि ख्रिसमस थीम फॉलो करण्याचा ट्रेंड दिसतो. यासाठी रेड-व्हाइट, रेड-ब्लॅक अशा कलर थीमनुसार पेहराव केला जातो.  

रेड आउटफिट्‌स - मुलींसाठी व्हाइट, ब्लॅक जीन्सवर घालण्यासाठी ब्लॅक-रेड कॉम्बिनेशनचे टॉप्स, सांताक्‍लॉजचे प्रिंट केलेले टी-शर्ट, वेगवेगळ्या डिझाइन्सच्या फ्रील, लेस लावलेले कुर्ते, रेड-ब्लॅक विंटर वेअर्स, कॅज्युअल्स, जॅकेट्‌स बाजारात आलेली आहेत. नाताळनिमित्त रेड कलरमधील टॉप्सची अधिक खरेदी होत आहे. काही मुलींना शॉर्ट वेस्टर्न आउटफिट्‌सला प्रिंटेड जीन्सचा चांगला पर्याय आहे. रेड बॅकग्राउंडवर व्हाइट डॉट जीन्सवर कॉटन, होजिअरी, लोकरीचा पोलोनेक फूल स्लिव्ह स्वेटर उठून दिसतो. लहान मुलांसाठी बाजारात सांताक्‍लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्ज आल्या आहेत. सांताने दिलेले गिफ्ट ठेवण्यासाठी कलरफुल सॅकही आलेले दिसतात. मुलींसाठी सांताक्‍लॉजसारख्या कानटोप्या, ब्रोच लावलेले रेड-व्हाइट, रेड-ब्लॅक कॉम्बिनेशनचे वन पीस, शॉर्ट स्कर्ट, गाऊन्स यांसारख्या वेस्टर्न आउटफिट्‌सची क्रेझ आहे. 

ॲक्‍सेसरीज : रेडिश आउटफिट्‌सबरोबर रेड, व्हाइट, गोल्डन कलरच्या चपला, प्लेन व्हाइट रेड स्टोन, क्रिस्टल ज्वेलरी, वाइल्ड प्रिंटेड स्टोल्स, स्कार्फ आणि डोक्‍यावर सांतासारखी टोपी घातल्यास परफेक्‍ट ख्रिसमस पार्टी लुक मिळतो. 

नेल आर्ट : पेहरावाला सुयोग्य अशा ॲक्‍सेसरीज घेताना आपल्या लुकवरही थोडा भर द्यायला हवा. यामध्ये मेकअप, नेल पेंट यांचा समावेश होतो. एखाद्या शॉपिंग मॉलमधील नेल आर्टिस्टकडून नखांवर नाताळची चिन्हे, ख्रिसमस ट्री, चांदण्या, जिंगलबेल्स, कॅंडिज, सांताची कॅप आदी रेखाटले जाते. या नेल आर्टमध्ये गोल्डन, व्हाइट, रेड कलरचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. नेलपेंट अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यावर चमकणारे कुंदन स्टोनही लावले जातात. 
 

मोबाईल कव्हर
स्मार्टफोनच्या व्हरायटीप्रमाणे त्यांच्या कव्हर्समध्येही नावीन्य आले आहे.

हेअर स्टाइल
ख्रिसमस पार्टीला जाताना एकदम सुटसुटीत आणि वेगळी हेअरस्टाइल केल्यास पेहराव उठून दिसण्यासाठी बाजारात रेड कलरच्या रिबन, क्‍लिप्स, हेअरबॅंड, कापडी फुले, गोल्डन ईअरकफ उपलब्ध आहेत. 
 

विविध प्रकारच्या पर्स
किरकोळ विक्रेत्यांपासून केवळ बॅग्ज, पर्सच्या दुकानांमध्ये नाताळनिमित्त व्हाइट, रेड, गोल्डन अशा रंगांच्या पर्सची प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते. यामध्ये क्‍लच पर्सपासून सांतासारख्या पोतडी पर्सच्या डिझाइन्स आल्या आहेत. कापडी बॅगवर एम्ब्रॉयडरी केलेला सांता, प्रिंट केलेली नाताळची चिन्हे असलेल्या बॅग्ज, सॅक वापरण्याची क्रेझ सध्या दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com