पुणे - लाखणगावच्या पुलावर सिनेमा स्टाईलने बिबट्याची एंट्री 

LEOPARD
LEOPARD

पारगाव (पुणे) : लाखणगाव ता. आंबेगाव येथील घोडनदीवरील पुलावर एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे सिनेमास्टाईलने समोरुन बिबट्या येतो, पुलाच्या मधोमध मोटारसायकलवर असलेल्या दत्तात्रय यशवंत टाव्हरे यांची समोर बिबट्या दिसताच घाबरगुंडी उडते, गाडीचा एक्सलेटर पिळला जातो गाडी रेस होते आणि बिबट्याही गडबडुन मोटारसायकलवर झेप घेतो. परंतु बिबट्याची झेप चुकते आणि बिबट्याची उडी पुलाच्या पलिकडे पडते. परंतु घाबरलेले दत्तात्रय टाव्हरे खाली पडतात केवळ नशीब बलवत्तर म्हणुन हातातील घड्याळाची काच फुटण्यावर निभावते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय येतो.

काल सोमवारी संध्याकाळी पावसाचे वातावरण झाल्यामुळे दत्तात्रय यशवंत टाव्हरे (रा. निरगुडसर ता. आंबेगाव) हे सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील चांडोह (ता. शिरुर) येथे शेतात काढुन ठेवलेले कांदे झाकुन ठेवण्यासाठी मोटार सायकलवरुन गेले. कांदे झाकून ते पुन्हा निरगुडसरला परत येत असताना चांडोहाच्या बाजूने लाखणगाव येथील घोडनदीच्या पुलावरून लाखनगावकडे येत असताना एक ते दोन मोऱ्या ओलांडून पुढे आले असता समोरून लाखणगावच्या बाजूने पुलावरून काहीतरी येत असल्याचे जाणवले. परंतु त्यांना सुरवातीला कुत्रे असल्याचे जाणवले परंतु जवळ आल्यानंतर तो बिबट्या असल्याचे दिसले. त्याने मोटारसायकल च्या दिशेने जोरात झेप घेतली.

घाबरलेल्या परिस्थितीत टाव्हरे यांना तो बिबट्या असल्याची जाणीव झाली त्यांच्या हातातून मोटारसायकल सुटली आणि ते खाली पडले गाडीच्या उजेडामुळे बिबट्याची उडी पुलाच्या पाईपावरून नदीकडेच्या पात्रात गेली आणि बिबट्या डरकाळ्या फोडत नदी शेजारील शेतात पळाला. त्याच वेळी पाठीमागुन काही अंतरावरुन येणाऱ्या मोटारसायकल स्वाराने हा थरार प्रत्यक्ष पाहीला त्यांनी पडलेल्या टाव्हरे यांना उठवुन व्यवस्थित असल्याची खात्री केली हात व पायाला किरकोळ घासले असून घड्याळाची काच फुटली आहे.

हे सगळे होऊन बिबट्याच्या तावडीतून सुटल्याचा निश्वास त्याने सोडला घाबरलेल्या अवस्थेत टाव्हरे गावी निरगुडसरला आल्यानंतर हा प्रकार त्याने ग्रामस्थांना सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com