"स्वच्छ'तेत यंदाही पुणे देशात अकरावे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे - स्वच्छतेसंदर्भात केलेल्या पाहणीत देशभरातील सुमारे पाचशे शहरांमध्ये पुणे शहराला यंदा पुन्हा अकरावे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षीही पुण्याला अकरावा क्रमांक मिळाला होता. 

पुणे - स्वच्छतेसंदर्भात केलेल्या पाहणीत देशभरातील सुमारे पाचशे शहरांमध्ये पुणे शहराला यंदा पुन्हा अकरावे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षीही पुण्याला अकरावा क्रमांक मिळाला होता. 

केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याच्या वतीने देशातील विविध शहरांची "स्वच्छ शहरे' या निकषांतर्गत पाहणी करण्यात येते. त्याकरिता "क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया' या संस्थेची नेमणूक केली आहे. त्याअंतर्गत विशेषतः शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन, त्याकरिता राबविलेल्या उपाययोजना, नवे प्रकल्प, त्यांची परिणामकारकता आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता याची पाहणी करून गुणांकन देण्यात येते. गेल्या वर्षी पुण्याला अकरावा क्रमांक मिळाला होता. त्यावेळी या उपक्रमांतर्गत 75 शहरांची पाहणी करण्यात आली होती. मात्र, यंदा शहरांची संख्या पाचशे होती. त्यात तीन लाखांपेक्षा 

कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होता. या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले होते. संस्थेच्या पाहणीआधी शहरभर विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली होती. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या छोट्या-छोट्या प्रकल्पांची उभारणीही केली होती. त्याच्या परिणामकारकतेचे सादरीकरणही करण्यात आले होते. त्यामुळे पाहिल्या पाच शहरांमध्ये पुण्याचा समावेश असेल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या या यादीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 44 शहरांचा समावेश आहे. यात नवी मुंबई, बृहन्मुंबई, शिर्डी, चंद्रपूर, अंबरनाथ, सोलापूर, ठाणे, धुळे, मिरा-भाईंदर, नागपूर, वसई-विरार, इचलकरंजी, नाशिक, सातारा, कुळगाव-बदलापूर, जळगाव, पनवेल, कोल्हापूर, नंदूरबार, नगर, नांदेड-वाघाळा, उल्हासनगर, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ, अमरावती, कल्याण-डोंबिवली, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, उदगीर, बार्शी, अकोला, औरंगाबाद, बीड, अचलपूर, वर्धा, लातूर, गोंदिया, हिंगणघाट, जालना, भिवंडी-निजामपूर, भुसावळ ही शहरे आहेत.

पुणे

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य...

05.12 PM

खडकवासला : नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. संतोष आवारी यांच्यावर ७५ वर्षीय रुग्णाकडून चाकूने हल्ला...

02.00 PM

पुणे - दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त साधून केंद्र, राज्य सरकार सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटत असल्याचे सांगत, महागाईचा निषेध...

04.27 AM