मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पुण्यातील आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

पुणे: कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी एक महिन्यात आराखडा तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी रविवारी दुपारी घेतलं. 

मार्केटयार्डमधील बिबवेवाडी येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस आणि ग्रामस्थांची बैठक रविवारी दुपारी झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. महापालिकेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

परदेश दौऱ्यावरून महापौर मुक्ता टिळक रविवारी शहरात परतल्या. दरम्यान, शहरात गेल्या 15 दिवसापासून सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.