रांजणगावात साई गणेश पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस

CNG gas on Sai Ganesh Petrol Pumps in Ranjangaon
CNG gas on Sai Ganesh Petrol Pumps in Ranjangaon

तळेगाव ढमढेरे: पुणे-नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपती मंदिरामागे साई गणेश पेट्रोलियम या पंपावर इंडियन ऑईलतर्फे सीएनजी गॅसची सुविधा
उपलब्ध करण्यात आली आहे.

पंपाचे मालक तुषार भैरवनाथ काळे यांनी ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी सीएनजीची सुविधा नुकतीच उपलब्ध करून दिली आहे. त्याचे उद्‌घाटन उपस्थित ग्राहकांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सुरुची डेअरीचे कार्यकारी संचालक भैरवनाथ काळे, इंडियन ऑईलचे पुणे विभागाचे प्रमुख सुब्रत रथ, पुणे नॅचरल गॅसचे उपाध्यक्ष श्रीधर तांबरपणी, मालक काळे उपस्थित होते.

पुणे-नगर रस्त्यावर वाघोली ते औरंगाबाद या रस्त्यावर कोठेही सीएनजी पंपाची सुविधा नव्हती; परंतु रांजणगावात ही सुविधा उपलब्ध झाल्याने वाहनधारकांना फायदा होणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. ही गरज ओळखून काळे यांनी सीएनजी पंप सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com