'COEP'त विद्यार्थ्यांनी अनुभवले रोमांचक प्रक्षेपण

'COEP'त विद्यार्थ्यांनी अनुभवले रोमांचक प्रक्षेपण

पुणे - पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) विद्यालयात आज (बुधवार) सकाळी अभुतपूर्व विज्ञानसोहळा अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अखेर श्रीहरीकोटा येथून ‘पीएसएलव्ही- सी 34‘ या प्रक्षेपकाच्या उड्डाण झाले आणि विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या यानाच्या साह्याने सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘स्वयम्‘ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले होते.

पीएसएलव्ही-सी 34 या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्याच्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मोहिमेस आज (बुधवार) यश आले. आज सकाळी 9.26 मिनिटांनी या प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. या प्रक्षेपणाचा रोमांचक क्षण पाहण्यासाठी विद्यार्थी सीओईपीच्या मुख्य सभागृहात एकत्र आले होते. यावेळी विद्यार्थी उपस्थितांना सॅटेलाईट लॉंचिंग संदर्भात बारीकसारीक गोष्टी समजावून सांगत होते. प्रत्येकाची लगबग आणि उत्साह नजरेत भरणारा होता. 

एक किलोग्रॅम वजनाचा नॅनो सॅटेलाईट असणारा ‘स्वयम्‘ हा प्रक्षेपण होऊ घातलेल्या उपग्रहांपैकी क्रमाने तिसरा होता. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत जात होता, तले उपस्थितांचा उत्साह, एकाग्रता वाढत होती. अखेर स्वयम् चे नाव घेण्यात आले आणि सभागृहात टाळ्या आणि आरोळ्या एकच आवाज झाला. आता ‘स्वयम्‘ अवकाशात स्वतःच्या गतीने निघाला. अखेर सत्यभामा आणि ‘स्वयम‘ प्रक्षेपणापासून वेगळे झाले. 

सीईओपीच्या या यशामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्येही आनंद आहे. हे आमच्या विद्यार्थ्यांच्या खडतर कष्टाचे यश आहे. त्यांचे अभिनंदन, असे पाटील या शिक्षकांनी सांगितले. तर, शिक्षक बी. एन. चौधरी म्हणाले की, 152 वर्षांचा इतिहास असणाऱ्या सीओईपीसाठी आजचा हा क्षण अभिमानास्पद आहे! जग आज सेल्फ लर्निंगकडे वळत असताना आपल्या महाविद्यालयाने आपले पूर्ण पोटेन्शियल आज सिद्ध करून दाखवले आहे, अभिनंदन. आजचा दिवस पुण्यासाठी ऐतिहासिक आहे. हा नॅनो नव्हे, त्याहूनही लहान असणारा पिको सॅटेलाईट होता. इस्त्रोचा प्रवास सोसायटल ट्रान्सफॉर्मेशनकडे सुरू झाला आहे, असे या निमित्ताने मी म्हणेन. आपण क्लिष्ट तंत्रज्ञानाचेही आता मास्टर झालो आहोत. ऍस्ट्रोनॉटिकल आणि जीपीएस तंत्रज्ञानानंतर आता ‘स्वयम्‘ आला आहे. आपण आता स्वावलंबनाच्या दिशेने कूच करत आहोत. येत्या काळात कॉस्ट इफेक्टिव्ह पद्धतीने लॉंचिंग करण्याचे प्रयत्न भारताकडून व्हावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com