पारा घसरला; थंडीचा कडाका वाढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे सोमवारी वर्तविण्यात आली. पुण्यातील किमान तापमानाचा पारा 9.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून, राज्यात सर्वांत कमी तापमान नगर येथे 8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील चोवीस तासांमध्ये थंडीच्या लाटेची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली, तर कोकण, गोवा व मराठवाड्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. नगरपाठोपाठ नाशिकचा पारा 9 अंश सेल्सिअसपर्यंत कमी आला आहे.

राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुण्याच्या आसपासच्या परिसरात येत्या बुधवारपर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

राज्याच्या प्रमुख शहरातील तापमानाचा पारा घरसला
उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा या भागातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढत आहे, असेही हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: cold in pune