महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी गिरविले स्वसंरक्षणाचे धडे 

saswad
saswad

सासवड (पुणे) : येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सासवड (ता. पुरंदर) येथील आयडियल तायकोंदो असोसिएशनच्या वतीने तायकोंदोच्या माध्यमातून विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा झाली. 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या साबळे फार्मसी महाविद्यालय ही कार्यशाळा काल आयोजित केली होती. कार्यक्रमास प्राचार्य  डॉ. आर .वाय. पाटील, जिल्हा बँक संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे, वृषाल भोंगळे, संतोष जगताप, किरण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यीनींनी पेनने, मेकअपच्या साहित्याने, बोटातील अंगठीने, हातातील कड्याने, अोढणीने स्वतःचे संरक्षण कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षक किरण गायकवाड यांनी यावेळी दिले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. 

प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले., आजच्या आधुनिक युगात महिला विविध क्षेत्रात विविध आघड्यांवर स्वतःचा ठसा उमटवत असताना त्यांना दररोज विविध प्रसंगाना सामोरे जावे लागते. त्यामध्ये एखादा प्रसंग त्यांच्या जिवावर बेतू शकतो. उच्च शिक्षणासोबत स्वतःचे संरक्षणाचे धडे घेत राहावेत. त्यासाठीच हा आजचा उपक्रम आहे. कार्यक्रमात प्रा. दुर्गाडे म्हणाले., विद्यार्थीनींनी निर्भयपणे राहावे. अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी धाडसाने पुढे यावे. योग्य व्यासपीठावर तक्रारही मांडावी. स्त्री हि सरस्वती, सावित्री, लक्ष्मी, अन्नपूर्णा आहे. पण वेळ आलीच तर तीच स्त्री दुर्गाचे रूप धारण करते. कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे प्रा. वैभव शिळिमकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. अमोल काळे यांनी केले. प्रस्तावना व आभार प्रदर्शन प्रा. गणेश निगडे यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com