विषय समिती अध्यक्षपदासाठी भाजप-आघाडीत लढत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये लढत होणार आहे. या पदांची निवडणूक 7 एप्रिल रोजी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. 

पुणे - महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये लढत होणार आहे. या पदांची निवडणूक 7 एप्रिल रोजी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. 

महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार या समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीत 13 सदस्य असून, त्यात भाजपचे 8, राष्ट्रवादीचे 3, कॉंग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. या चारही समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे पीठासीन अधिकारी असतील. या पदासाठी अर्ज भरण्याची आज (ता. 3) मुदत होती. 

शहर सुधारणा अध्यक्षपदासाठी भाजपचे महेश लडकत, तर आघाडीच्या सुमन पठारे, उपाध्यक्षपदासाठी किरण दगडे पाटील, तर आघाडीचे प्रदीप गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. या समितीच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र शिळीमकर यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते; परंतु नाराज असल्यामुळे त्यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे लडकत यांना संधी देण्यात आली आहे. 

विधी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या ऍड. गायत्री खडके, तर आघाडीचे भैय्यासाहेब जाधव, उपाध्यक्षपदासाठी भाजपचे जयंत भावे, तर आघाडीचे ऍड. हाजी पठाण यांनी अर्ज भरले आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या राणी भोसले यांनी, तर आघाडीच्या सायली वाजंळे आणि उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योती गोसावी, आघाडीच्या लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज दाखल केले. क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे सम्राट थोरात, आघाडीचे रफिक शेख यांनी, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या श्‍वेता खोसे-गलांडे, आघाडीचे किशोर ऊर्फ बाळू धनकवडे यांनी अर्ज भरले आहेत. 

भाजपचेच अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार 

महापौर, उपमहापौर निवडणूक राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने लढविली; मात्र स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे चारही विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध होतील, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती; पण या पदांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने अर्ज दाखल केले आहेत. या चारही विषय समित्यांमध्ये भाजपचे आठ सदस्य असल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांचेच होणार आहेत. 

Web Title: Committee president BJP alliance against