आयटीतील महिलांशी साधला पोलिस आयुक्‍तांनी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे - पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांना सुरक्षिततेची हमी देत महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या "बडीकॉप' व्हॉट्‌सऍप ग्रुपचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

चंदननगर पोलिसांच्या वतीने बुधवारी खराडी येथील ईऑन आयटी पार्कमध्ये "बडीकॉप' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त शशिकांत शिंदे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्‍त दीपक साकोरे, पंचशील रिऍलिटीचे अध्यक्ष अतुल चोरडिया, चंदननगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर, सायबर सेलच्या पोलिस निरीक्षक राधिका फडके, पंकज घोडे आदी या वेळी उपस्थित होते. 

खराडी परिसरातील आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी "बडीकॉप' ग्रुप सुरू करण्यात आला आहे, त्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या ग्रुपचा महिलांनी वापर करावा, असे आवाहन शुक्‍ला यांनी केले. या कार्यक्रमास आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टॅग्स