सासवडला वाघीरे महाविद्यालयात निर्माल्य, पत्रावळ्यांचा कंपोस्ट खत प्रकल्प

saswad
saswad

सासवड (पुणे) : येथील वाघीरे महाविद्यालयाने तयार केलेल्या कंपोस्ट खत प्रक्रिया पीटमध्ये पालखी काळात गोळा केलेले निर्माल्य आणि पत्रावळी आणून टाकण्यात आली. त्यातून परिसर स्वच्छ होतानाच.. बायो कल्चरव्दारे चांगले खतही निर्मितीचा आनंद मिळणार आहे. या कंपोस्टींग प्रकल्पाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर हस्ते करण्यात आले.

सासवड (ता. पुरंदर) येथील वाघीरे महाविद्यालयात माऊलींच्या पालखी सोहळ्यात स्वच्छता व पर्यावरण यांच्या संदेश देणाऱया दिंडीतील विद्यार्थ्यांशी संवादही कुलगुरु व मान्यवरांनी साधला. त्यानिमित्त महाविद्यालयातही कार्यक्रम झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने पुणे ते पंढरपूर दिंडी आयोजित केली आहे. यंदा दिंडीमध्ये काही काळ सहभागी होण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. करमळकर यांच्यासह वित्त व लेखा अधिकारी डाॅ. विद्या गारगोटे, परीक्षा नियंत्रक डाॅ. अशोक चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डाॅ. विलास उगले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, डाॅ. दिपक माने, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डाॅ. प्रभाकर देसाई, प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे उपस्थित होते. त्यानिमित्त संवाद, मार्गदर्शन व कंपोस्ट खत प्रकल्प प्रारंभाचे उपक्रम झाले.  

कुलगुरू डाॅ. करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी दिंडी चालावी, त्यातून व्यायाम घडतोच.. शिवाय सामाजिक दृष्टीकोनातून अपेक्षित संदेश अनेक समाजापर्यंत पोचतो. अशा उपक्रमामध्ये हे विद्यार्थी सहभागी झाल्याचे कौतुक वाटते. पर्यावरणरक्षणाची जबाबदारी आपली असून त्यासाठी या वारीच्या रूपाने आपण कृतिशीलपणे सहभागी होतोय हे समाधान आहे. प्लॅस्टिकचा वापर वाढल्याने त्याचे अनेक विपरीत परिणाम होत आहेत. त्यातूनच प्लॅस्टीकमुक्त वारी करण्यामध्ये विद्यार्थ्यांनी यापुढे अधिक भर द्यावा. अॅड. संदीप कदम म्हणाले., दिंडीत चालून आनंद घेतल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. सध्या कामामुळे व धावपळीमुळे ताणतणावाचे प्रमाण वाढते आहे. पायी चालल्याने मानसिक थकवा कमी होतो व नवी ऊर्जा मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतिश बोंगाणे यांनी केले. प्राचार्य डाॅ. घोरपडे यंानी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संदीप राठोड, प्रा. सुभाष वाव्हळ, प्रा. महेश फुले, डाॅ. विद्या पाटणकर, प्रा. दिपक जांभळे, प्रा. माया गायकवाड आदींनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com