वाहतूक नियंत्रणासाठी संगणक साक्षरांची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

पिंपरी - वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत; मात्र अपुऱ्या पोलिस यंत्रणेमुळे त्याआधारे कारवाई करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणेचा पूर्णपणे वापर करून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संगणक साक्षर युवकांची मानधनावर नेमणूक करण्याची सूचना चिंचवडमधील युवक चिन्मय कवी याने केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविली होती. त्याची दखल घेऊन देशातील छोट्या राज्यांत किंवा शहरांमध्ये ही संकल्पना राबविण्याचे संकेत गडकरी यांनी दिले आहेत. 

वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या अनेक भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र कक्ष उभारला आहे; मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियम तोडणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवणे पोलिसांना शक्‍य होत नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते.

त्यातून मार्ग काढण्यासाठी संगणक साक्षर युवकांची या कामासाठी मानधनावर नेमणूक केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे सहज शक्‍य होणार असल्याचे कवी यांनी नमूद केले आहे. तसेच युवकांना रोजगार मिळणे शक्‍य असल्याचे कवी यांचे म्हणणे आहे. त्यांच्या संकल्पनेचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत केले असून, देशातील छोटी राज्य व शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याचे संकेत दिले आहेत. त्याबाबत येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

स्मार्ट सिटीत समावेश करणार 
संगणकसाक्षर युवकांची सीसीटीव्ही नियंत्रणासाठी नियुक्‍ती करण्याच्या प्रस्तावाचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार विचार करीत आहे. तसे झाल्यास प्रत्येक शहरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे चिन्मय कवी यांनी सांगितले.

Web Title: Computer literacy help to control traffic