कॉंग्रेस उमेदवारांचा एकत्रित घरोघरी प्रचार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी (प्रभाग क्रमांक 14 ) मधील कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी सोमवारी घरोघरी जाऊन गाठीभेटी आणि नागरिकांशी व्यक्तिगत संवाद साधण्यावर भर दिला. कॉंग्रेच्या अधिकृत उमेदवार आयशा अजीज सय्यद, उपमहापौर मुकारी अलगुडे, मयुरी शिंदे आणि नारायण पाटोळे यांनी "व्हिजन विकासाचे, स्मार्ट प्रभागाचे' या घोषवाक्‍यासह संयुक्तरीत्या प्रचार केला. 

शिवाजीनगर गावठाण, रोकडोबा मंदिर परिसर आणि गावठाणातील विविध चाळींतून फिरत चौघांनीही मतदारांशी संवाद साधला. कॉंग्रेस पक्षाने कायमच सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले असून, येत्या काळात पुणे शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसला निवडून द्यावे, असे आवाहन सय्यद, अलगुडे, शिंदे आणि पाटोळे यांनी केले. 

घरोघरी जाऊन महिला, पुरुष व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन सर्वसामान्यांना कॉंग्रेस पक्षाला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभागात केलेल्या विविध कामांची माहिती नागरिकांना दिली. 

ऍड. फैयाज शेख, माजी नगरसेवक मनोहर नांदे, सुनील पंडित, अबिद सय्यद, शाबीर सय्यद, रुकैया शेख, कल्पना लोहार, आरती निलावर आदी कार्यकर्त्यांनी आपल्या माणसाला निवडून देण्यासाठी मतदारांना आवाहन केले. 

पुणे

पुणे : 'गणेशोत्सव नक्की कोणी सुरू केला ?... तो 'ह्यांनी' सुरू केला की 'त्यांनी' सुरू केला, यापेक्षा तो सुरू झाला आणि तो...

05.27 PM

टाकळी हाजी (शिरूर, जि. पुणे): "ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले...

04.24 PM

पुणे : पत्नी आई आणि वडीलांना सांभाळत नाही. घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते. याचा राग आल्यामुळे पत्नीचा तिच्या ओढणीने...

11.42 AM