गर्दी, उत्साहात रंगला कॉंग्रेसचा दिवाळी फराळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे -  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह शिवसेनेच्या शहराध्यक्षांची उपस्थिती... भाजपने फिरविलेली पाठ... आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरू असलेली गर्दी आणि संगीताचे सूर... अशा वातावरणात कॉंग्रेस पक्षाचा "दिवाळी फराळा'चा कार्यक्रम रंगला.

कॉंग्रेस भवन येथे शनिवारी कॉंग्रेस पक्षाने दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे इच्छुकांची वाढलेली संख्या कॉंग्रेस भवनात दिसून आली. विधान परिषदेचे उपसभापती आणि कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थितांची भेट घेत होते. बिशप थॉमस डाबरे, पाठक गुरुजी, विविध मौलाना यांच्यासह उपमहापौर मुकारी अलगुडे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार जयदेव गायकवाड, अनिल भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी महापौर मोहनसिंग राजपाल हेही या मेळाव्याला उपस्थित होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, "आरपीआय'चे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बाळासाहेब जानराव हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. जितेंद्र भुरुक प्रस्तुत संगीत रजनीचा कार्यक्रम या वेळी सादर झाला.

Web Title: Congress Diwali snacks