महापौरांच्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

पुणे - आरक्षणाबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसनेही आंदोलन केले. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अप्पा बळवंत चौकात आंदोलन करण्यात आले. 

महापौरांच्या वक्तव्याने पुण्याची बदनामी झाली असून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाशिकमधील एका कार्यक्रमात महापौरांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद शहरात उमटत असून, विरोधी पक्षांसह विविध संस्था- संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 

बागवे म्हणाले, ""राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराच्या महापौरांनी केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. त्यामुळे समाजातील इतर घटकांच्या भावना दुखावल्या असून महापौर किंवा त्यांच्या पक्षाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. महापौरांचे वैचारिक परिवर्तन व्हावे, यासाठी त्यांच्या पक्षाने पुढाकार घ्यावा आणि महापौरांनी माफी मागावी.''