बांधकाम व्यावसायिकाला न्यायमंचाचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे - करारनाम्यात नमूद केलेल्यापेक्षा कमी क्षेत्रफळाची सदनिका देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला तीन लाख 8 हजार रुपये परत द्यावेत, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. 

पुणे - करारनाम्यात नमूद केलेल्यापेक्षा कमी क्षेत्रफळाची सदनिका देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला तीन लाख 8 हजार रुपये परत द्यावेत, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. 

या प्रकरणी गुरुवार पेठेतील बाळासाहेब डोईफोडे, राजश्री डोईफोडे यांनी बांधकाम व्यावसायिक रॉयल प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे भागीदार रिझवान इस्माईल खान यांच्याविरुद्ध न्यायमंचाकडे तक्रार केली होती. बांधकाम व्यावसायिकाने गुरुवार पेठेत "रॉयल इनक्‍लेव' हा गृहप्रकल्प बांधला होता. या प्रकल्पात डोईफोडे यांनी सदनिका घेतली होती. त्यासाठी करारनाम्यानुसार त्यांनी 36 लाख 88 हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाला दिले होते. पार्किंगसाठी दोन लाख रुपयेही त्यांनी दिले होते. बांधकाम व्यावसायिकाला वेळोवेळी त्यांनी 11 लाख 6 हजार रुपये दिले होते. त्याच्या पावत्या वेळोवेळी मागूनही बांधकाम व्यावसायिकाने त्या देण्यास टाळाटाळ केली होती. वीजजोड, कर आदीसाठी एक लाख 32 हजार रुपयेही दिले होते. 

सर्व रक्कम दिल्यानंतरही पार्किंगसाठी जागा दिली नाही, स्वयंपाक घरातील ओट्याचे काम सुमार दर्जाचे केले असा दावा करीत डोईफोडे यांनी नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यास बांधकाम व्यावसायिकाने ही तक्रार चुकीची असून, ती फेटाळण्यात यावी असा दावा केला होता. डोईफोडे आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात पार्किंगच्या जागेवरून झालेला वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता. त्या संदर्भातील कागदपत्रे डोईफोडे यांनी न्यायालयात सादर केली. करारनाम्यात सदनिकेचे नमूद क्षेत्र आणि आर्किटेक्‍टकडून मिळालेल्या प्रमाणपत्रातील सदनिकेचे नमूद क्षेत्र यात 31 चौरस फुटांची तफावत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. तो न्यायमंचाने ग्राह्य मानला. डोईफोडे यांच्यातर्फे ऍड. ज्ञानराज संत आणि ऍड. एल. के. जाधव यांनी बाजू मांडली.

Web Title: The consumer has given the order Construction businessman