धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

पुणे - बहुतेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हालका पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. भीमा खोऱ्यातील 25 धरणांमध्ये शुक्रवारी सकाळी एकूण 31.94 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 14.84 टक्के, तर कृष्णा खोऱ्यातील 11 प्रमुख धरणांमध्ये 43.84 टीएमसी (20.89 टक्के) पाणीसाठा झाला होता.

पुणे - बहुतेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हालका पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. भीमा खोऱ्यातील 25 धरणांमध्ये शुक्रवारी सकाळी एकूण 31.94 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 14.84 टक्के, तर कृष्णा खोऱ्यातील 11 प्रमुख धरणांमध्ये 43.84 टीएमसी (20.89 टक्के) पाणीसाठा झाला होता.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये 6.92 टीएमसी (23.74 टक्के) पाणीसाठा झाला आहे. सध्या होणाऱ्या दिवसाआड पाणीपुरवठाप्रमाणे पाणी पुरविल्यास येत्या डिसेंबरपर्यंत सध्याचे पाणी पुरेल. टेमघर धरणाच्या क्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वरसगावला सात मिलिमीटर, पानशेतला आठ मिलिमीटर व खडकवासला धरणाच्या क्षेत्रात दोन मिलिमीटर पाऊस पडला.

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये 9.73 टीएमसी (20.78 टक्के) पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणाच्या जलाशयात गेल्या दोन दिवसांत सुमारे दोन टीएमसी पाण्याची भर पडली. उजनीत सध्या (उणे) 25.44 टीएमसी पाणीसाठा आहे.

धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
धरणाचे नाव साठा क्षमता आजचा साठा टक्केवारी

टेमघर           3.71 0.46 12.42
वरसगाव       12.82 2.49 19.45
पानशेत        10.65 2.97 27.87
खडकवासला   1.97 1.00 50.63
पवना            8.51 2.35 27.62
मुळशी          18.47 5.59 30.27
चासकमान     7.58 1.11 14.69
भामा आसखेड  7.67 2.04 26.62
आंद्रा             2.92 1.40 47.98
गुंजवणी         2.16 0.50 23.22
भाटघर         23.50 5.05 21.50
निरा देवघर   11.73 2.42 20.63
वीर              9.41 1.75 18.62
माणिकडोह   10.17 0.38 3.70
येडगाव        2.80 0.12 4.28
वडज           1.17 0.09 7.82
डिंभे           12.49 1.11 8.89
घोड            5.47 0.00 0.00
उजनी        53.57 (-) 25.44 (-) 47.48

Web Title: Continued growth in the water supply dams