कंत्राटी सफाई कामगारांना वेळेवर पगार नाही, नगरसेवकांकडे साकडे

रमेश मोरे
शनिवार, 7 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभाग क्रं ३२ मधील महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे पगार ठेकेदार वेळेवर करत नसल्याने सफाई कामगारांनी काही वेळ काम थांबवत थेट नगरसेवकाचे कार्यालय गाठुन नगरसेवकांस व्यथा सांगितल्या.

महापालिकेच्या वतीने ठेकेदाराकरवी काम करत असलेल्या सफाई वेळेवर कामगारांना वेळेवर कामाचा पगार मिळत नसल्याने त्यांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावे लागत आहे.आधीच असलेला तुटपुंजा पगार व तोही वेळेवर मिळत नसल्याने सफाई कामगारांची पिळवणुक होत आहे. या प्रभागातील ठेका बदलला मात्र सध्या येरे माझ्या मागल्या,अशीच परिस्थितीची वेळ येथील सफाई कामगारांवर येवुन ठेपली आहे.

आधीच्या ठेकेदारानेही कधी कधी तीन तीन महिने पगार थकविले होते. अनेकांचे पीएफ,फंड भरला जात नव्हता. आता नविन ठेका व ठेकेदार बदल करण्यात आला असलातरी कामगारांची पिळवणुक थांबत नसल्याचे समोर आले आहे. यासाठी सफाई कामगारांनी शनिवार ता.७  काही काळ काम बंद ठेवत नगरसेवकाकडे पगार करण्यासंबंधी साकडे घातले.

याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले, ठेकेदाराला वेळेवर पगार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.याचबरोबर पुर्वीचा मिळणारा पगार सात हजार आठशे रूपये पगारात वाढ करून यात वाढ करून ८५०० रू किमान पगार देण्याबाबत मी संबंधित अधिकारी व  ठेकेदाराकडे मी मागणी केली आहे.
"आम्ही कंत्राटी सफाई कामगारांची कामाची उपस्थिती व कामाची माहीती मुख्यालयास कळवतो.पगारा संबंधीत सर्व अधिकार वरिष्ठ व ठेकेदार ठरवतात, असे आरोग्य निरिक्षक उद्धव डवरी यांनी सांगितले. 

वेळेवर पगार होत नसल्याने घर चालवण्यासाठी उसनवारी करावी लागते.वेळेवर पगार होत नाही, असे सफाई कामगार सुजाता गंगावणे यांनी सांगितले. 

आत्ता आम्हाला ठेकेदाराकडुन सातहजार आठशे ईतका पगार दिला जातो. तो कामाच्या मोबदल्यात कमी असुन घर भागत नाही.अनेकांची भाड्याची घरेआहेत. पगार वाढ तर होत नाही किमान वेळेवर तरी द्यावा.

Web Title: contract base cleaners dont get salary