सीबीएसई शाळांवर नियंत्रण - जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

पुणे - ‘‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मान्यता घेतली की काहीच बंधने नाहीत, असा समज झाला आहे. या शाळा पैसा कमाविण्याचे साधन झाल्या आहेत; पण शिक्षण हा व्यवसाय नाही. त्यामुळे या शाळांवर नियंत्रण आणण्याबरोबर त्यांचे शुल्क माफक करण्याची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे,’’ असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. 

शालेय शिक्षणात नावीन्यपूर्ण बदल आणि अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने देशाच्या पश्‍चिम विभागातील राज्यांसाठीची कार्यशाळा पुण्यात आयोजित केली आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय सचिव अनिल स्वरूप, सहसचिव अजय तिर्के आणि राज्याच्या शिक्षण खात्याचे प्रधान सचिव नंदकुमार व्यासपीठावर उपस्थित होते.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर भाष्य करताना जावडेकर म्हणाले, ‘‘इंग्रजी भाषा म्हणजे प्रगती असा समज रूढ झाला आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा कल त्या शाळांकडे असतो. हा ओघ असाच सुरू राहिला, तर सरकारी शाळा बंद पडतील; परंतु मोदी सरकार हे होऊ देणार नाही. आम्ही सरकारी शाळांचा दर्जा
सुधारण्यावर एवढा भर देत आहोत, की इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून विद्यार्थी आमच्या शाळांकडे वळतील.’’