पुणे : मूर्ती विटंबना प्रकरणी नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक

bagave.jpgbagave.jpg
bagave.jpgbagave.jpg

पुणे : महाराष्ट्रचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा व नगरसेवक अविनाश बागवे यास खडक पोलिसांनी अटक केली.  ट्रॅक्टर चालक व साउंड सिस्टिम चालकास मारहाण आणि मूर्ती विटंबना केल्याप्रकरणी त्यांना आज (ता.24)अटक करण्यात आली.  


कासेवाडी येथील अशोक मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक रविवारी रात्री साडे सहा वाजता राजीव गांधी पतसंस्थसमोरील रस्त्याने जात होती. त्यावेळी बागवे याने ट्रॅक्टरचालक सोमनाथ म्हस्के व साऊंड सिस्टिम चालक ओंकार कोली यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सांगितले. याप्रकरणी युवराज सुलतान अडसुळ याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बागवेसह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान बागवे यांच्यावतीनेही परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com