नगरसेवकांची आज अजित पवारांसोबत बैठक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

पुणे - महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर आगामी काळातील भूमिका ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमवेत पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक रविवारी (ता. 5) होणार आहे. दरम्यान, महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि नव्या शहराध्यक्षांच्या नावांची चर्चा होण्याची शक्‍यता आहे. त्याकरिता पवार प्रत्येक नगरसेवकाशी वैयक्तिक संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची पीछेहाट झाली असून, या पक्षाला केवळ 38 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. निकालानंतर पवार हे सोमवारी पहिल्यांदाच शहरात येत आहेत. बारामती होस्टेल येथे या नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात विरोधी पक्षनेता आणि शहराध्यक्षांच्या नावाबाबत चर्चा होईल. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत त्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर लक्ष ठेवताना विरोधी पक्ष म्हणून पक्षाची नेमकी रणनीती कशी असेल, याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.