नगरसेविका नामधारी; पतिराजाच कारभारी ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - महापालिकेतील बहुतांशी नगरसेविकांच्या प्रभागांमधील विकासकामांपासून जनसंपर्कापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांचे "पतिराज' सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर प्रभागातील कामे किंवा नव्या प्रभाग रचनेबाबत नगरसेविकांकडे विचारणा केली तरी, "त्यांच्या'शी बोलता का ? असा प्रश्‍नवजा सल्ला "त्या' देत असल्याचे नगरसेविकांशी संपर्क साधल्यानंतर जाणवते. परिणामी, बहुतेक नगरसेविका या "नावापुरत्या'च असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

पुणे - महापालिकेतील बहुतांशी नगरसेविकांच्या प्रभागांमधील विकासकामांपासून जनसंपर्कापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांचे "पतिराज' सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर प्रभागातील कामे किंवा नव्या प्रभाग रचनेबाबत नगरसेविकांकडे विचारणा केली तरी, "त्यांच्या'शी बोलता का ? असा प्रश्‍नवजा सल्ला "त्या' देत असल्याचे नगरसेविकांशी संपर्क साधल्यानंतर जाणवते. परिणामी, बहुतेक नगरसेविका या "नावापुरत्या'च असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेच्या गेल्या म्हणजे, 2012 च्या निवडणुकीत 152 पैकी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या 76 नगरसेविका निवडून आल्या. त्यातील काही नगरसेविका दोनदा आणि तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत; तर काहीजणी पहिल्यांदाच निवडून आल्या. शहरातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही "त्या' फारशा बोलत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. या "मौनी' नगरसेविकांचे प्रमाण वाढल्याचे एका खासगी संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या पाहणीच्या अहवालावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. एवढेच नव्हे, प्रभागातील महत्त्वाच्या प्रश्‍नांबाबत "पतिराजां'च्या सल्ल्यानुसारच सभागृहात "त्या' भूमिका मांडत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून प्रभागात गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात नेमक्‍या कोणत्या योजना आणल्या, त्याचे परिणाम काय, याची विचारणा केल्यानंतर माहितीसाठी बहुतेक नगरसेविका या त्यांच्या "पतिराजां'चेच नाव सुचवीत असल्याचेही दिसून आले आहे. तर, नव्या प्रभागरचनेत काय बदल झाला, कोणत्या प्रभागातून लढणार आहेत, या प्रश्‍नांची उत्तरे "ते'च देतात. प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समजून त्या सोडविण्याची कामेही "ते' करीत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, त्या त्या भागातील नगरसेविकांच्या जनसंपर्क कार्यालयात "पतिराज' नागरिकांची गाऱ्हाणी ऐकतात. त्यामुळे महापालिकेतील निम्म्याहून अधिक नगरसेविका या "नाममात्र' असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. 

प्रभागात प्रभावी काम 
महापालिकेतील बहुतेक नगरसेविकांची कामे त्यांचे "पती' करीत असले तरी काही नगरसेविकांनी आपल्या प्रभागात प्रभावी कामे केली आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या योजना राबविण्यात महिलांचा पुढाकार दिसून आला आहे. तसेच, प्रभागातील रखडलेल्या प्रश्‍नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असल्याची उदाहरणे आहेत.

पुणे

पिंपरी - संरक्षण विभागाने देशभरातील मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ‘खडकी, पिंपरी...

12.24 AM

पुणे - बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याद्वारे 43 हजार रुपये काढल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आणखी एका नायजेरियन नागरिकाला...

12.09 AM

सासवड - पुरंदर तालुक्याचे पाऊसमान घटल्याने गेली कित्येक दिवस पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे टँकर मागावे लागत आहेत. तर ते न...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017