बसपासवर खाडाखोड करून पैशांचा अपहार 

बसपासवर खाडाखोड करून पैशांचा अपहार 

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) दोन कर्मचाऱ्यांनी मुदतबाह्य बसपासवर खाडाखोड करून साडेआठ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीएमपी प्रशासनाने दोघांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुरेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. 

त्यावरून प्रदीप सोमनाथ वरे (वय 24, रा. दौंड) आणि एक महिला (रा. मांजरी) या दोघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरे आणि संबंधित महिला हे दोघेही पीएमपीचे कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांची लष्कर परिसरातील महात्मा गांधी बसस्थानकावर नेमणूक होती. दोघांनाही बसचे पास वितरित करण्यासाठी नेमले होते. मात्र, दोघांनीही पीएमपीच्या मुदतबाह्य बसपासवर खाडाखोड केली. तेच पास बस प्रवाशांना वितरित केले.

हा प्रकार 21 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत सुरू होता. याबाबत पीएमपी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली. त्या वेळी दोन्ही कर्मचाऱ्यांनी पीएमपीची फसवणूक करून साडेआठ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com