‘कॉसमॉस’च्या आरोपींचे चेन्नई कनेक्शन

Cosmos-bank
Cosmos-bank

पुणे - कॉसमॉस बॅंक सायबर दरोड्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बॅंक सायबर दरोडा प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. यासंदर्भातील पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, तर चार आरोपींनी याबाबतची कबुली दिली आहे.  

ऑगस्ट महिन्यात कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) सायबर हल्ला झाला होता. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथून सात जणांना अटक केली होती. दरम्यान वर्षभरापूर्वी चेन्नई येथील सिटी युनियन बॅंकेवर सायबर हल्ला झाला होता. कॉसमॉस व सिटी युनियन बॅंक या दोन्ही ठिकाणच्या सायबर हल्ल्याचा तपास विशेष तपास पथकाकडून करण्यात येत होता. 

पथकाने अटक केलेल्या शेख महंमद, फहीम खान, ॲन्थोनी ऑगस्टीन व नरेश महाराणा या चौघांचा चेन्नईतील सिटी युनियन बॅंकेवरील सायबर हल्ल्याची कबुली दिली आहे. सिटी युनियन बॅंकेतील ३३ कोटी रुपयांची रक्कमही कॉसमॉसप्रमाणेच एटीएम स्वीचवर सायबर हल्ला करून पळविण्यात आली होती. या प्रकरणातील एका आरोपीकडून पोलिसांनी दोन लाख, तर दुसऱ्या आरोपीच्या खात्यातील ४८ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर आणखी पाच जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

सिटी युनियन बॅंक प्रकरणातील आरोपींना आत्तापर्यंत अटक झाली नव्हती. त्यांच्यापर्यंत पोचणे अवघड होते. कॉसमॉस बॅंक प्रकरणाचा तपास करताना आम्ही सात जणांना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्या वेळी सातपैकी चार जणांचा सिटी युनियन बॅंक हल्ल्यात सहभाग असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.
- ज्योतीप्रिया सिंह, पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com