शारीरिक संबंधास नकार दिल्याने चुलतीची हत्या

sangeeta salve
sangeeta salve

मंचर (पुणे): शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या घरी जाऊन चुलतीची निर्घुण हत्या पुतण्याने केली. सदर घटना बुधवारी (ता. 27 ) पहाटे साकोरी (ता. जुन्नर) येथे घडली. वटपौर्णिमेच्या दिवशी सदर घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी शिवाजी गेनू साळवे याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालय उपचार सुरु आहे.

संगीता देविदास साळवे (वय 50 रा. साकोरी, ता. जुन्नर) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव असून, त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत होत्या. त्यांचे पती देविदास खंडू साळवे (वय 54) हे साकोरी गावचे पोलिस पाटील असून त्यांनी पत्नीचा खून झाल्याची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

मंगळवारी (ता. 26) रात्री देविदास, संगीता, मुलगा राहुल व मुलगी त्रिवेणी यांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर संगीता या घराबाहेरील पडवी मध्ये कॉटवर झोपल्या होत्या. इतर सर्वजण घरामध्ये झोपले होते. बुधवारी पहाटे पावणे पाच वाजता “मला वाचवा, मला वाचवा’’ असा संगीताचा ओरडण्याचा आवाज आला. दरवाजा उघडून देविदास, मुलगा राहुल व मुलगी त्रिवेणी बाहेर आले. आरोपी पुतण्या शिवाजी साळवे याच्या हातात धारदार शस्त्र होते. संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आरोपी शिवाजी साळवेला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

“मला झोपेतून उठून शारीरिक सुख दे. असे शिवाजी साळवे म्हणाला. त्यावेळी शारीरिक संबंध ठेवण्यास मी विरोध केला. म्हणून त्याने मला चिडून माझ्या डोक्यात, तोंडावर, डाव्या हातावर, उजव्या पायाचे पोटरीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.’’ असे गंभीर आवस्थेत संगीताने सांगितले. त्यानंतर संगीताला आळेफाटा येथील माउली व सोनवणे हॉस्पिटलमध्ये, नारायणगाव येथील विघ्नहर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केले. पण प्रकृती अत्यावस्थ झाल्याने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तपासणी पूर्वीच संगीता मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, असे देविदास साळवे यांनी मंचर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

मंचर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आळेफाटा पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. या प्रकरणी पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती डमाळे करत आहेत.

शिवाजी साळवे याच्यावर मंचर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. असे मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संपत केदारी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com