धक्कादायक - पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाकडून महिलेवर बलात्कार

पुण्यात महिलेवर बलात्कार, ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांकडून अटक
latest Pune Crime News
latest Pune Crime NewsCrime
Summary

पुण्यात महिलेवर बलात्कार, ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांकडून अटक

पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाकडून महिलेवर बलात्कार झाल्याची असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स चालकाकडून पुण्यात आलेल्या महिलेचे अपहरणकरून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे पु्ण्यात खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी संबंधित 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ट्रॅव्हल चालक नवनाथ शिवाजी भोंग (वय 38) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. (latest Pune Crime News)

घडलेली घटना अशी की, संबंधित महिला आणि तिचा पती पुण्यात खोली शोधत असताना ट्रॅव्हल्समध्ये विश्रांती घे, असं सांगून चालकाने ट्रॅव्हल्स बस कात्रज परिसरात नेली. तिथे गेल्यानंतर चालकाने पीडित महिलेवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. चालक नवनाथ शिवाजी भोंग (38) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

latest Pune Crime News
पुणे ग्रामीणमधून धक्कादायक बातमी, ११ तरूण बिश्नोई गँगच्या संपर्कात

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला वाशीम जिल्ह्यातील असून ती पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात दोघे राहण्यासाठी खोली शोधत होते. रात्री उशीर झाल्यामुळे आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेला होता.

दरम्यान, पती वॉशरूमला गेल्याचे पाहून आरोपी भोंग याची नियत फिरल्याने त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा तिला शोधत होता. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत असून पुण्यात महिला सुरक्षततेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

latest Pune Crime News
'महाआघाडीची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं अशी झालीये'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com