सराईत गुन्हेगार वर्षासाठी स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - गावठी हातभट्टीची दारू विकण्याच्या आरोपावरून पाच गुन्हे दाखल असलेल्या अनिल प्रीतम कुंभार (वय 43, रा. श्रीधर हिलपॉइंट, धनकवडी) याच्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याला एक वर्षासाठी येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. 

कुंभार गावठी हातभट्टीची दारू विकणारा सराईत गुन्हेगार आहे. गेल्या दोन वर्षांत त्याच्यावर पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी त्याच्यावर झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी त्याला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षात 30 सराईत गुन्हेगारांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक कारवाई झाली असून, गेल्या तीन महिन्यांत पाच जणांवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: criminals detained for the year