संकष्टी चतुर्थीमुळे लेण्याद्रीला पहाटेपासून भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
गुरुवार, 3 मे 2018

पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक व जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. उन्हाळ्यातील सुट्टयांमुळे दिवसभर गर्दी होती. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या.

जुन्नर : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (गुरूवार) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची पहाटेपासून गर्दी असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी दिली. देवस्थानच्या वतीने दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. 

पहाटे देवस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते भाविकांच्या उपस्थितीत श्रींना विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा व आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दिवसभरात देवस्थानचे सेक्रेटरी शंकरराव ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर गडदे, प्रभाकर जाधव, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे उपस्थित होते.

तसेच दिवसभर पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक व जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. उन्हाळ्यातील सुट्टयांमुळे दिवसभर गर्दी होती. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या.

आज सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री  9.58 वाजता चंद्रोदयाच्या वेळी गिरिजात्मजकाची महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप होईल.

देवस्थान ट्रस्टचे वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि.14 मार्च, 18 एप्रिल, 28 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 15 विवाह पार पडले. तसेच दि.6 मे व 12 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकरराव ताम्हाणे यांनी दिली.

Web Title: The crowd of devotees from the dawn