सध्याच्या सभागृहाची शेवटची जीबी' पीएमपीसाठी ठरली महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - महापालिकेच्या सध्याच्या सभागृहाची या महिन्यातील शेवटची सर्वसाधारण सभा बसखरेदीपासून ते डेपोंच्या जागांपर्यंतच्या निर्णयांमुळे पीएमपीसाठी महत्त्वपूर्ण ठरली, तर शहर हितासाठी आवश्‍यक असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेने पुढचे पाऊल टाकले. तसेच राडारोड्यातून विटा, पेव्हमेंट ब्लॉक तयार करण्यासाठी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र, पक्षीय राजकारणामुळे कात्रज- कोंढवा रस्त्याच्या विकसनाचा ठराव फेटाळला गेला.

महापालिकेच्या आगामी वाटचालीसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुमारे सात तास चालले.

पक्षांतराच्या उंबरठ्यावर असलेल्या तीन नगरसेवकांनाही मनसेने कारणे दाखवा नोटीस बजावली. समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जरोखे उभारण्याच्या प्रक्रियेला मंजुरी मिळाली. पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस घेण्याच्या आणि प्रवाशांना महिन्यातून एकदा मोफत प्रवास देण्याच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मंजुरी दिल्यास त्याची अंमलबजावणी होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्येही राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा तीन जानेवारीला होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यास त्या सभेत निर्णय घेता येणार नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता गृहित धरून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवार यांच्या, तर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने व्यूहरचना केली होती.

समान पाणीपुरवठा योजना पुढे सरकली
- 1550 बस घेण्यासाठी पाठबळ देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय
- पीएमपीतर्फे दर महिन्यात सोमवारी मोफत प्रवास
- जकात नाक्‍यांची 4 ठिकाणची 21 एकर जागा पीएमपीला
- वाघोलीतील राडारोड्यातून विटा तयार करण्याचा प्रक्रिया प्रकल्प मंजूर
- कात्रज कोंढवा रस्त्याच्या विकसनाचा ठराव फेटाळला

पुणे

पुणे - श्रावणात दडी मारलेल्या पावसाने रविवारी शहरात ‘कमबॅक’ केले. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर...

04.33 AM

पुणे - संगीत, नृत्य, गायन, वादन अशा विविध कलांचा आविष्कार असणाऱ्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे यंदाचे २९ वे वर्ष असून हा महोत्सव २५...

03.48 AM

पुणे - ""राज्य सरकार ई-ग्रंथालयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे प्रकाशकांनी आत्तापासूनच ई-बुककडे मोठ्या प्रमाणात वळायला...

03.24 AM