बेलवाडीमध्ये ४० सायकलींचे वाटप

Cycle
Cycle

वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्रीमती हिराबाई हरीबा देसाई विद्यालयामध्ये ४० सायकलींचे वाटप करण्यात आले. 

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यामध्ये तीन हजार सायकलींचे वाटप करण्यास सुरवात झाली. येथील विद्यालयामध्ये सहावी ते नवीच्या ४० मुलींना नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष  अर्जुन देसाई यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार,विद्यमान संचालक सर्जेराव जामदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. शुभम निंबाळकर,सरपंच माणिक जामदार,उपसरपंच स्वाती नानासो पवार,  शाळेचे मुख्याध्यापक मचाले उपस्थित होते.

स्वखर्चाने २१ सायकली मोफत देण्याची घोषणा....
शाळेतील ४० मुलींना सायकली दिल्यानंतर २१ मुलींना सायकलची गरज असल्याने नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांनी २१ सायकली मोफत देण्याची घोषणा केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com