सायकल ट्रॅक नेमका कुणासाठी?

हडपसर - दुचाकी वाहनचालकांकडून बीआरटी मार्गावरील सायकल ट्रॅकचा होत असलेला वापर.
हडपसर - दुचाकी वाहनचालकांकडून बीआरटी मार्गावरील सायकल ट्रॅकचा होत असलेला वापर.

हडपसर - हडपसर-स्वारगेट बीआरटी मार्गावर महापालिकेतर्फे सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, सायकलींसाठी हक्काच्या असलेल्या या मार्गावरून इतर वाहने धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तसेच या मार्गावर अतिक्रमणेही झाली आहेत. यामुळे का मार्ग नेमका कुणासाठी, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सायकलस्वारांचा प्रवास सुरक्षित व्हावा, सायकल वापराला प्रोत्साहन मिळावे आणि इंधनाची बचत व्हावी, हा या प्रकल्पामागील उद्देश होता; परंतु प्रत्यक्षात या मार्गावर सायकलस्वारांना जागोजागी विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. 

काही ठिकाणी रस्ता अरुंद आहे म्हणून सायकल मार्ग बेपत्ता झाला आहेत, तसेच काही अंतरानंतर ते पुन्हा सुरू झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण न झाल्याने या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे सायकलस्वार या मार्गाचा वापर करताना दिसत नाहीत. ते रस्त्याच्या कडेने जीव मुठीत धरून मार्गक्रमण करीत असतात. दोन ते अडीच मीटर रुंद असणालेल्या या ‘ट्रॅक’चा वापर पार्किंगसाठी आणि अनधिकृत पथारीवालीवाल्यांसाठी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हा मार्ग पार्किंग, राडारोडा व कचऱ्यांने व्यापलेला  दिसत आहे. 

अतिक्रमणांचा विळखा
नागरिकांकडून जास्तीत जास्त सायकलचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेने हा प्रकल्प राबविला; परंतु त्याकडे प्रशासनाचे सध्या दुर्लक्ष होत आहे. शहरातील इतर सायकल मार्गावरील अतिक्रमणे झाली आहेत. हा मार्ग वापरण्यास प्रोत्साहन देणे व जनजागृती होणे आवश्‍यक आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. सायकल मार्गावरील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. 

सायकल ट्रॅकचा वापर हा तर येथील वाहन पार्किंग, फळविक्रेते आणि पथारी व्यावसायिकांसाठीच होताना दिसत आहे, त्यामुळे सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच जावे लागते. 
- संतोष जगताप, नागरिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com