पुणे- सोलापूर महामार्गाच्या दुभाजकावरील जाहिरातबाजी जीवघेणी

कृष्णकांत कोबल
बुधवार, 30 मे 2018

मांजरी (पुणे) :  पुणे- सोलापूर महामार्गावरील दुभाजकावर शेजारील व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे लक्ष्मीकाँलनी ते कवडीपाट टोलनाका या भागातील दुभाजकाच्या सुशोभीकरणा ऐवजी विद्रुपीकरण होऊन वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. 

मांजरी (पुणे) :  पुणे- सोलापूर महामार्गावरील दुभाजकावर शेजारील व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे लक्ष्मीकाँलनी ते कवडीपाट टोलनाका या भागातील दुभाजकाच्या सुशोभीकरणा ऐवजी विद्रुपीकरण होऊन वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. 

या महामार्गाच्या दोन्हीही बाजूला द्राक्ष संशोधन केंद्रापर्यंत विविध प्रकाचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. रस्त्यावर रील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून थेट दुभाजकावरच जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. एकापाठोपाठ एक वेगवेगळे फलक दिसत असल्याने अनेक वाहनचालक हे फलक वाचण्यासाठी याठिकाणी अचानक वाहनाचा वेग कमी करीत असतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत आहे.  

वाहतूक पोलीस किंवा राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याचे लक्षात आल्याने असे जाहिरात फलक लावणारांमध्ये दररोज वाढच होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढण्यास मदत होत आहे. हे जाहिरात फलक जीवघेणे ठरण्या आगोदरच ते काढून टाकले जावेत व दुभाजकावर शोभेच्या वनस्पती लावाव्यात अशी मागणी प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

यापूर्वी संबंधीत व्यवसायिकांना शाखा अभियंता ए. एल. गिरमे यांनी अनेकदा तोंडी सूचना देऊन फलक काढून टाकण्यास सांगितले आहे. मात्र व्यवसायिकांनी त्याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही. 

"या अतिक्रमणाची नव्याने पाहणी करून व माहिती घेऊन संबधीतांना फलक काढण्याच्या सूचना दिल्या जातील. त्याबाबत त्यांनी सकारात्मकता न दाखविल्यास योग्य कारवाई करण्यात येईल.''
- शत्रुघ्न काटकर, शाखा अभियंता, महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: dangerous posters on divider on pune solapur highway