पुणे : लग्नास नकार दिल्यामुळे पेटवून घेणाऱ्या तरुणीचा मृत्यू

Suicide_Fire_12.jpg
Suicide_Fire_12.jpg

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) शिवाजीनगर येथील स्वच्छतागृहात पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा आज उपचार सुरु असताना 90 टक्के भाजल्याने शनिवारी सकाळी पावणे बारा वाजता मृत्यु झाला. प्रेमसंबंध असलेल्या लिपिकाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचलले.

पूनम जाधव (वय 25) असे मृत तरुणीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब वाघमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता कार्यालयात आली होती. त्यानंतर तिचे संबंधित कार्यालयातील प्रेमसंबंध असलेल्या लिपीकाशी तिची भांडणे झाली. त्यानंतर पूनमने कार्यालयातील स्वच्छतागृहात जाऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. 

दरम्यान पूनम मोठ्या प्रमाणात भाजल्याने तिच्या किंकाळ्या कार्यालयात ऐकू आल्यानंतर कर्मचार्यांनी तिला वाचवुन रुग्णलयात दाखल केले होते.  पूनम ही 90 टक्के भाजली होती. याप्रकरणी राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविला आहे. 

"संबंधित तरुणीचे लिपिकाशी प्रेमसंबंध होते. दिड वर्षापूर्वी लिपिकाने दुसऱ्या मुलीशी विवाह केला होता. त्यानंतरही तरुणीने लिपिकाबरोबर लग्न करण्याची मागणी केली होती. मात्र त्याच्याकडुन प्रतिसाद मिळत नव्हता. शुक्रवारी दोघांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर तरुणीने पेटवुन घेतले. आज तिचा मृत्यु झाला." 
- आप्पासाहेब वाघमले, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस स्टेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com