पुण्यात नऊ वर्षाच्या मुलाचा विषबाधेमुळे मृत्यू 

food poison
food poison

पुणे : अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका कुटुंबास उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने त्यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना एका मुलाचा मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात ही घटना घडली. 

सार्थक संदीप डोंगरे (वय 9, रा. आनंदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. संदीप डोंगरे (वय - 33), त्यांच्या पत्नी जान्हवी (वय - 30), सार्थक व मोठा मुलगा साहिल हे चौघेजण गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा ते बाहेर जेवण करून घरी आले. त्यानंतर सार्थक याला रक्ताची उलटी झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याचवेळी उर्वरीत तिघांनाही त्याच पद्धतीचा त्रास झाल्याने त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच सार्थकचा मृत्यू झाला. संदीप डोंगरे व साहिल अत्यवस्थ झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्नातून विषबाधा झाली असण्याची शक्‍यता आहे. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com