बैलाने धडक दिल्यामुळे तरुणाचा मृत्यू 

संदीप घिसे 
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : बैलाने धडक दिल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी काळेवाडी येथे घडली. शशिकांत चिरोजीलाल धोबी (वय २२ रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील स्मशानभूमीजवळ ग्यानसिंग श्रीपत यादव यांच्या मालकीचा गोठा आहे. या गोठयांमध्ये काम करीत असताना शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास बैलाने धडक दिल्यामुळे शशिकांत हे गंभीर जखमी झाले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Web Title: The death of the youngster due to the bull's dash

टॅग्स